Breaking
राजकिय

गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर भाजप लासलगाव महिला मंडळाची नवी जबाबदारी; पुष्पाताई दरेकर यांची शहराध्यक्षपदी निवड

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील

1 2 0 4 3 4

न्यायभूमी 

लासलगाव :दिनांक १४ सप्टेंबर

गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडळाच्या वतीने महिला संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पदनियुक्ती करण्यात आली. लासलगाव भाजपा महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. संगीता सुरसे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सौ. पुष्पाताई सुरेश दरेकर यांची भाजपा लासलगाव महिला मंडळाच्यामहिला शहराध्यक्षपदी निवड जाहीर केली.

या निवडीचे भाजपचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, राष्ट्रीय उपअध्यक्ष भारतीताई पवार, जिल्हाध्यक्ष यतिनजी कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सोनाली राजे पवार, लासलगाव-येवला विधानसभा प्रमुख अमृताताई पवार, जिल्हा सरचिटणीस सुवर्णाताई जगताप, महिला मंडळ जिल्हा सरचिटणीस स्मिताताई कुलकर्णी, शंतनूभाऊ पाटील, प्रकाशशेठ डायमा, संपतराव नागरे आणि कैलासशेठ सोनवणे यांनी स्वागत करून पुष्पाताई दरेकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून या निवडीचे झालेले स्वागत हे लासलगाव महिला संघटनेच्या आगामी वाटचालीला मिळालेली महत्त्वपूर्ण बळकटी मानली जात आहे.

या निवडीच्या वेळी भाजपा लासलगाव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या प्रास्ताविकात सरचिटणीस निलेश जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तसेच महिला मंडळाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी डॉ. संगीता सुरसे करीत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

मंडळ अध्यक्ष निलेश सालकाडे यांनी मनोगत व्यक्त करताना पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या व्यक्तिसापेक्ष नसून पक्ष संघटन आणि पक्षाच्या प्रत्येक कार्याला समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने होत असल्याचे नमूद केले.

यावेळी निलेश सालकाडे म्हणाले की, “पद हे केवळ नावापुरते भूषविण्यासाठी नसते, तर पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी असते.

पद स्वीकारल्यानंतर त्या जबाबदारीचे स्वरूप समजून घेऊन संघटन वाढविण्यासाठी सातत्याने कार्य करणे अपेक्षित असते.” पुष्पाताई दरेकर यांच्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा निश्चितच भाजपा महिला मंडळाला फायदा होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव शहरात महिलांचे भक्कम संघटन उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ.संगीता सुरसे यांनी पुष्पाताई दरेकर यांची निवड ही पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव, महिलांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विविध उपक्रमांमधील सहभाग लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी

सौ. पुष्पाताई दरेकर यांचा सामाजिक आणि महिला संघटन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे. त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून विविध बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून महिलांच्या प्रश्नांशी व सामाजिक कार्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

त्या माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब पाटील यांच्या भगिनी असून लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या कन्या आहेत.

सामाजिक कार्याची परंपरा, महिलांमध्ये असलेला जनसंपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांचा अनुभव या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मंडळाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्या प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुष्पाताई दरेकर यांच्या निवडीमुळे लासलगाव शहरातील भाजपा महिला संघटनेला नवे नेतृत्व आणि नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात महिलांचे संघटन अधिक व्यापक करण्यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंडळ अध्यक्ष निलेश सालकाडे, उपाध्यक्ष उत्तम नागरे, सरचिटणीस निलेश जगताप, ज्येष्ठ नेते दत्तूलालजी शर्मा, राजाभाऊ चाफेकर, गणेश फड, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. युवराज पाटील, योगेश पाटील, चंद्रशेखर होळकर, वाल्मीकजी गायकवाड, राजूभाऊ राणा, पिंपळगाव नजीक शहराध्यक्ष ओम चव्हाण, श्वेताताई चव्हाण, ज्योतीताई शिंदे, विद्याताई माठा, डॉ. वैशाली पवार, पवारताई, रश्मीताई माठा, राजश्री फड, प्रेरणा लुनावत यांच्यासह महिला मंडळाचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिवशी झालेली ही नियुक्ती लासलगाव भाजपा महिला संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, पक्ष संघटन वाढीसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 0 4 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे