डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती फेरीचे आयोजन
Nyaybhumi news
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १६ नोव्हेंबर प्रतिनिधी :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.
येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढणे यासाठी स्वीप कार्यक्र मांतर्गत निवडणूक आयोगाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावातून घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या हातात मतदान विषयक घोषणा देणारे फलक दिसून आले.
मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो,मतदानासाठी वेळ काढा-आपली जबाबदारी पार पाडा, चला मतदान करू या- लोकशाही रुजवू या घोषनांनी गाव व परिसर दुमदुमाला. ठिकठिकाणी गावातील ज्येष्ठ नागरिक ,तरुण, महिला व नवमतदार यांना जनजागृती फेरीमध्ये सहभागी करून घेण्यात आले.
रॅलीत शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे,विठ्ठल तात्या वामने,श्रीमंत पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे,माजी सरपंच शरद माळी, अर्जुन वाजे,अण्णासाहेब वारुंगसे,मोहन माळी,सुनिल ढोली आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आव्हान यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे, शाळाबाह्य उपक्रम समिती प्रमुख सोमनाथ गिरी मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे,पी.आर.करपे, केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकारी सोमनाथ गिरी,डोंगरसिंग रबडे, शिवाजी गुरूळे , कचेश्वर शिंदे,पोलीस पाटील प्राध्यापक रामदास वारुंगसे, मारुती डगळे, सोमनाथ पगार,सुनील ससाने ,व्ही. टी. देवरे,ऋषिकेश कुंदेआदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


