ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे नाशिक जिल्हा कार्यकारणिच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील साधकांना जिवन गौरव व उत्कृष्ट साधक पुरस्कार प्रदान
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक दि.१५ नोव्हेंबर किरण जोशी
ग्राहक पंचयायत महाराष्ट्र ची नाशिक जिल्हा कार्यकारीणी बैठक नेक्टर हॉस्पीटल सभागृह नाशिक येथे डॉ संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.
या बैठकीत तळोदा येथील आभ्यासवर्गात जाहीर करण्यात आलेल्या जिवन गौरव पुरस्कार तसेच उत्कृष्ट साधक पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.
यात जिवन गौरव पुरस्कार श्री गव्हाणे तात्या इगतपुरी,प्रभाकर झळके येवला,सुधीर काटकर नाशिक,दत्ताजी शेळके सिन्नर,उल्हास शिरसाठ नाशिक तसेच उत्कृष्ट साधक पुरस्कार वसंतराव दंडवते लासलगाव,सतीश शुक्ल मुल्हेर,हरीष मारु मालेगाव यांना जिल्हाध्यक्ष डॉ संजय पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ संजय पाटील उपाध्यक्ष वसंतराव दंडवते तसेच श्री व सौ धारणकर,डॉ राजेंद्र बागुल,भास्कर पाटील,एकनाथ पाचरणे,विजय पाटील,सतीश शुक््ल,किरण जोशी,उल्हास शिरसाठ,संदिप नगरकर,नारायण पिंपळे,प्रकाश जोशी परेश महाजन इ उपस्थित होते.



