न्यायभूमी दि १४ सप्टेंबर
मेढा तारीख 13 सप्टेंबर 2025 मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा.ना.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मेढा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन न्या.डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
सदर लोक अदालती मध्ये न्यायालया मधील दिवाण व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती.
त्या मध्ये एकूण 582196/– वसुली झाली तसेच दाखलपूर्व केसेस मध्ये 643271/– रु. ची वसुली झाली एकूण 1216467/– रु ची वसुली झाली.
सुरुवातीला लोकन्यायालयाचे उद्घाटन मेजर डॉ. अशोकराव गिरी साहेब प्राचार्य आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सुधीर पाटील सहा.पोलीस निरीक्षक मेढा पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र बँक, बडोदा बँक,एस.बी.आय.बँक चे मॅनेजर यावेळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदर लोकन्यायालयाच्या पॅनलवर मा. डॉ. विक्रम आव्हाड साहेब व श्री ॲड.राजेंद्र पोफळे यांनी कामकाज पाहिले.लोकन्यायालय हा आप-आपसात समजस्यांने वाद संपुष्टात करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून लोकांनी लोकासाठी लोकांच्या हितासाठी भरविण्यात येते असे मत व्यक्त केले.
सदर लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138, कौटुंबिक प्रकरण,तसेच बँकिंग विषयी वसुलीच्या केसेस,ग्रामपंचायत विभाग इत्यादी प्रकारच्या केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आलेल्या होत्या.
कुटुंबीक हिंसाचार कायद्या नुसार दाखल असलेली जवळ जवळ २२ वर्षांपूर्वी ची केस आज संपूर्ण रक्कम भरल्याने आज निकाली करण्यात आली.
सर्वच पक्षकारांनी चांगले सहकार्य केलेले असून त्यांना मा. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि केसेस जास्तीत जास्त तडजोड करण्याचा प्रयत्न केला.
तसेच लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी मेढा बारचे ॲड.विशाल महाडिक,ॲड.सतीश शिंदे, ॲड.आरती शेटे,ॲड.पूनम गोरे इत्यादी वकील वर्ग तसेच मेढा न्यायालयातील कर्मचारी वर्ग सहाय्यक अधीक्षक संदीप मोरे,रमेश पवार,रवींद्र करंजेकर,अवधूत कुलकर्णी, संभाजी पालखे, प्रशांत लिंगडे,आप्पा आवटे विधी स्वयंसेवक ऋषिकेश शिंदे,श्रावणी काशीलकर, योगिता लिंगडे,प्रतीक्षा जाधव,पंकज मगदूम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



