Breaking
महाराष्ट्र

ऑपरेशन सिंदूरच्या यशाबदल लासलगाव मंडलात भव्य तिरंगा bike रॅली उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि ०२ जून मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी,शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर सेवा देणाऱ्या जवानांना पाटिंबा देण्यासाठी आज लासलगाव मध्ये अत्यन्त उत्साह व जल्लोषात भव्य bike तिरंगा रॅली काढण्यात आली.

ही रॅली पिंपळगाव नजीक येथून छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर व संभाजी महाराज यांना वंदन अभिवादन करून सुरू झाली.  

या रॅलीमध्ये.अनेक जवान,ज्येष्ठ नागरिक,तरुण आणि भारत देशावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

ही रॅली एकतेचा आणि देश प्रेमाचा संदेश देणारी होती. शहीद जवानांच्या बलिदानाला मान देत आणि सध्या देशासाठी लढणाऱ्या जवानांना पाठिंबा देणारी ही रॅली प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम जागवत गेली.

विशेष म्हणजे दिव्या कुमावत व खुशी आगळे यांच्या भारत माता च्या वेषभूषे ने रॅली चे लक्ष वेधून घेतले होते.

या प्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री नासिक सुवर्णाताई जगताप,लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे,राजाभाऊ चाफेकर,दत्तू लालजी शर्मा,लासलगाव सरपंच योगिता योगेश पाटील,पिंपळगाव नजीक सरपंच हिरामण माळी,ऍडव्होकेट उपसरपंच राजूभाऊ जाधव,मनीष चोपडा,नितीन राजूडे,सागरभाऊ खुटे,सागर मुंजाळ,बापूसाहेब लचके,लक्ष्मण खलसे,सोमनाथ गांगुर्डे,संतोष राजोळे,संजयभाऊ महाले,श्रीकांत भावसार,ओम चव्हाण,सुनील नेवगे,गोरख गांगुर्डे,उषाताई कुमावत,सीमाताई दरेकर, भारतीताई महाले,शैलजा भावसार रुपाताई केदारे, कैलास सोनवणे,रमेश खोडके,देशमुख सर,राजू सुरसे,भूपेश दगडे,रवी वाघ,कल्याण होळकर,आनंद भोर रवी घोडे,सोनू गायकवाड, प्रकाश पवार इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे