Breaking
ब्रेकिंग

भेळ भत्ता गोदामास भीषण आग पिंपळगाव बसवंत मध्ये भीषण अग्नितांडव

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

पिंपळगाव बसवंत दि २१ मार्च प्रतिनिधी निखिल अहिरे 

पिंपळगाव बसवंत येथील महेश भेळ भत्ता तसेच शेजारील दोन तीन गोडाऊन व दुकानाना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास भीषण आग लागली आगीने थोड्याच वेळात रुद्ररूप धारण केले.

 त्यात या आगीमध्ये जवळील बॅटरी चे दुकान,बांबूचे गोडाऊन,तसेच भेळ भत्त्याचे गोडाऊन,भंगार गोडाऊन,तसेच आजूबाजूच्या परिसरातील राहणारे घरे जळून खाक झाले.

  अजून संध्याकाळ होऊनही अद्याप आग विझली नसून अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले असून आग कशी लागली यावर नागरिकांमध्ये 

अनेक प्रश्न निर्माण झाले असून आग कशामुळे लागली असेल हे अजून स्पष्ट झालेले नसून अंदाजे दोन ते तीन कोटी रुपये चे नुकसान झाले चे समजते नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.

आग लागल्यापासून आतापर्यंत घटनास्थळी अग्निशमन दलाचे देवळा,चांदवड,नाशिक,ओझर निफाड येथून दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यात निफाड तालुक्यातील आमदार दिलीप काका बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सरकार कडून मदतीचे आश्वासन दिले आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे