Breaking
महाराष्ट्र

लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचा”नो प्लास्टिक गणेश संकल्प”

न्यायभुमी न्यूज

0 8 9 9 7 9

न्यायभूमी

लासलगाव दि ११ सप्टेंबर निशिकांत पानसरे 

लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे यंदा गणेशोत्सव “नो प्लास्टिक गणेश संकल्प” उपक्रमातून साजरा करण्यात आला.

ढोल-ताशाच्या गजरात या उपक्रमाची सुरुवात करत असोसिएशनने समाजाला पर्यावरणपूरकतेचा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

या वेळी डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. नागरिकांना कापडी पिशव्या व रोपे भेट देऊन प्लास्टिक मुक्त जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.

 

Oplus_131072

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन म्हणाले, “प्लास्टिकचा वापर कमी करणे केवळ पर्यावरणच नव्हे तर आपल्या शरीराचे आरोग्य जपणे होय.प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण हे फुफ्फुस व श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरते.

तसेच हवेतील प्रदूषण कमी केल्यास हृदयविकार व उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण घटते.”

या उपक्रमातून लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनने समाजाला आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचे महत्त्व पटवून दिले.

 

Oplus_131072

या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन,सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, ज्येष्ठ सदस्य डॉ.सुबोध पटणी,डॉ.सुरेश दरेकर, डॉ.कैलास पाटील,डॉ.संगीता सुरसे,डॉ.संजय पलोड,डॉ.मनीषा पलोड,डॉ.घनघाव सर व मॅडम, डॉ.अमित धांडे व सौ.धांडे मॅडम,डॉ.अमोल गायकर,डॉ.विलास कांगणे,डॉ.प्रतिभा घायाळ, डॉ.विकास चांदर,डॉ.प्रताप पवार व सौ.पवार मॅडम,डॉ.रोहिणी गांगुर्डे व असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे