Breaking
राजकिय

विंचूरमध्ये‘उबाठा’शिवसेनेला मोठे खिंडार

माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पवारांचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

0 8 9 9 9 4

​न्यायभूमी

 विंचूर दि.१९ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर

विंचूर गटातील राजकीय समीकरणे बदलली असून,उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला येथील संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

​विकासाच्या मुद्द्यावर पवारांची साथ

​गेल्या अनेक वर्षांपासून विंचूर परिसरात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पवार यांनी उबाठा शिवसेनेला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाभिमुख भूमिका आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे यावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतला आहे,”असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

​पक्ष संघटन मजबूत करण्याचे भुजबळांचे आवाहन

​नूतन सदस्यांचे स्वागत करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा पक्ष आहे.

नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून संघटन अधिक बळकट करावे.”

​या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा झाला प्रवेश:

​ज्ञानेश्वर पवार यांच्यासोबत विंचूर गटातील अनेक महत्त्वाच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यात प्रामुख्याने:

​नीलेश दरेकर (गटप्रमुख, उबाठा शिवसेना)

​बापूसाहेब जाधव,विलास निकम,कुणाल सांगळे (पदाधिकारी)राहुल कापसे,सुशील सोनी,योगेश सूर्यवंशी,गोकुळ कांगणे,ईश्वर गायकवाड,लखन कांबळे,शेखर गरड,मंगेश रणधीर,संदीप खांदोडे,गणेश रणधीर,सागर साळुंखे,सागर गरड यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

​उपस्थित मान्यवर:

या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, पांडुरंग राऊत, विलास गोरे,सचिन दरेकर,किशोर जेउघाले,किशोर साळुंके,गोविंद हिरे,जयंत साळी,सोहेल मोमिन,मोहसिन शेख,अनिल विंचूरकर,इस्माईल मोमीन,अमजद पठाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे