Breaking
महाराष्ट्र

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण!

रामकुंडावर धार्मिक विधींसह ध्वजारोहण सोहळा उत्साहात; १३ आखाड्यांचे महामंडलेश्वर, साधू-संत आणि मान्यवरांची उपस्थिती

1 3 2 4 5 5

न्यायभूमी 

नाशिक | दिनांक ३१ ऑक्टोंबर 

नाशिकच्या पवित्र गोदावरी तीरावरील श्रीरामकुंड येथे सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य धर्मध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विधिवत पूजन व धार्मिक विधी करून धर्मध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोदावरीच्या तीरावर फडकलेला धर्मध्वज आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या धार्मिक वातावरणाची आणि तयारीची प्रतीकात्मक सुरुवात ठरला.

या ऐतिहासिक सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री, १३ आखाड्यांचे महामंडलेश्वर, विविध आखाड्यांचे साधू-संत, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पारंपरिक उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याने नाशिकच्या आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडविले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातील भाविकांचे लक्ष आता नाशिककडे लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 4 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे