महावितरणमध्ये बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या कामावरून गंभीर प्रश्न!
टेंडर संपले,तरी कामावर बोलावले; अपघात झाला तर जबाबदार कोण?

न्यायभूमी
नाशिक | बुधवार दि.०७ ऑक्टोबर २०२६

महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागातील बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरून गंभीर प्रशासकीय प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित एजन्सीचा कार्यादेश जुलै २०२६ मध्ये संपलेला असतानाही बाह्यस्रोत वायरमन, यंत्रचालक आदी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याचे दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिकृत पत्रातून समोर आले आहे.
एकीकडे नवीन टेंडर व ९०% रिटेन्शनचा प्रस्ताव प्रलंबित, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात असल्याने कार्यादेशाची वैधता आणि सक्षम मंजुरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सर्वात गंभीर प्रश्न — अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
कार्यादेश संपल्यानंतर कामावर असलेल्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास जबाबदारी एजन्सीची, महावितरणची की संबंधित कामगाराची? याबाबत महावितरणने स्पष्ट, लेखी खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
कार्यादेशाशिवाय काम? सुरक्षा कोणाची? जबाबदारी कोणाची?
बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार?
कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन देण्याऐवजी वैध कार्यादेश, सक्षम मंजुरी, सुरक्षा आणि अपघातातील जबाबदारी स्पष्ट करूनच कामकाज घेण्यात यावे,अशी मागणी जोर धरत आहे.


