Breaking
महाराष्ट्र

कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद शाळे जवळ फलक लावावा

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील, मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 3 1 7 5 4

न्यायभूमी  कोळगाव दिनांक ३० सप्टेंबर

अजिंक्य जगताप

 

कोळगाव ता निफाड येथील विंचूर ते कोळगाव रस्ता हा शिर्डी कडे जाणारा मधला व सुखरूप मार्ग म्हणून ओळखला जातो हा रस्ता झाल्याने शिर्डी कडे जाणारे भाविक व गुजरात कडील पाई जाणाऱ्या दिंड्या ह्या मार्गाने जात आहे हा रस्ता पि डब्लु डी कडे वर्ग आहे.

हृया रस्त्यालगत प्रत्येक वळणावर व सगळ्या शाळा या ठिकाणी फलक लावण्यात आले परंतु कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा यांची जणू दप्तरी नोंद झालीच नाही असे दिसते येथे कोणत्याही प्रकारचा फलक नाही व लावण्यात ही आला नाही सदर शाळेच्या आवारात सध्या बालवाडी देखील सुरू आहे ह्या लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय शाळा सुटल्यावर हे विद्यार्थी अचानक रस्त्यावर येऊन काही अनुचित प्रकार घडू नये कारण फलक नसल्याने वाहन चालकांना येथे शाळा आहे.

 समजणार कसे तरी प्रशासनाने आपलीं तत्परता दाखवली पाहिजे व होणाऱ्या संभाव्य परिणामाला ओळखून फलक लावावा अशी मागणी पालक आणि रहीवाशी करत आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 7 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे