Breaking
गुन्हेगारी

चेक बाऊन्सच्या खटल्यामध्ये मेढा न्यायालयाने आरोपीला सुनवली १ वर्ष करावयाची शिक्षा…!!

न्यायभूमी न्यूज

1 3 1 7 2 3

न्यायभूमी

मेढा : दिनांक ३० सप्टेंबर

दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा येथील न्यायालयात फिर्यादी अनिल शंकरराव देशमुख यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या संक्षिप्त फौजदारी खटला १५५/२०१५ या चेक बाऊन्सच्या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने त्या खटल्यातील आरोपींला शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात निर्मिती इंटरप्राईजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे आरोपी राहुल राम चिकने रा. ६३४, प्रियदर्शनी अपार्टमेंट, भारत ज्योती बस स्टॉप जवळ बिबवेवाडी पुणे ३० यांनी फिर्यादी कडून झालेल्या व्यवहारा बद्दल रक्कम रुपये १,००,०००/- परत करण्यासाठी चेक दिला होता.

परंतु सदर चेक न वाटल्याने त्यांच्याविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चे कलम १३८ अंतर्गत चेक बाऊन्स चा खटला दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने चेकची रक्कम पहाता आरोपीस प्रकरण सामोपचारणे मिटविण्याकामी संधी दिली व वेळोवेळी लोकन्यायालयात ठेवले परंतु प्रकरण सामोपचाराने मिटले नाही.

त्यानंतर या खटल्यात नियमानुसार सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी आरोपी राहुल राम चिकने यांस दोषी ठरवत एक वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच चेकची रक्कम व त्यावरिल व्याज ०३ महिन्यांच्या आत अदा न केल्यास एक महिना अधिकची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या खटल्यात फिर्यादीच्या वतीने विधीज्ञ आर. एस. पोफळे यांनी काम पाहिले. सदर निकालामुळे चेक विनाकारण बाऊन्स करणाऱ्यांना चांगलाच धसका बसला असून आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त राखली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या पूर्वी देखील मेढा न्यायालयाने गेल्या ६ महिन्यात २ चेक बाऊन्सच्या प्रकरणात शिक्षा सुनावल्या आहेत.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 7 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे