विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

न्यायभूमी
विंचूर दिनांक २२ सप्टेंबर

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनिल मालपणी, सदस्य, उत्तर विभाग सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था, सातारा व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर सुजित गुंजाळ, सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था, सातारा व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीसाठी सज्ज असलेल्या रथातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयातील उपलब्ध असलेल्या एकूण ४० वर्गांना विविध विषयांवर आधारित कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली होती. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज परिवर्तन, धार्मिक-अध्यात्मिक विचार, देशभक्तीपर गीत अशा विविध विषयांनी सजलेल्या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले.
ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात तसेच ‘कर्मवीर भाऊराव पाटील’, ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ आणि ‘रयत शिक्षण संस्था’ यांच्या जयघोषात विंचूर गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे, सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था यांनी केले.
याप्रसंगी जगदिश जेऊघाले अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, नानासाहेब जेऊघाले, किरण दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम तसेच पी.के.जेऊघाले, ज्ञानेश्वर गाडे, दत्तात्रय दरेकर, अशोक दरेकर, पत्रकार सुनील क्षीरसागर, अण्णा कुमावत, विनायक जेऊघाले, आहेर सर, सुमनताई दरेकर, संदीप जोशी, आबासाहेब दरेकर, सोनाली कापडणीस, सचिन सालकाडे, योगेश चव्हाण, ढवन सर, किरण सूर्यवंशी, दिनकर चव्हाण, कविता मोरे, राजू मोरे, विजय शिरसाठ, डॉक्टर सचिन जेऊघाले, अशोक सोनी, मालती जाधव, सतिश शेलार, गणेश कोलते सर, प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ, विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उप मुख्याध्यापक सुरेश वाबळे, संस्थेची लाईफ वर्कर व विद्यालयाचे पर्यवेक्षक जयवंत ठाकरे, पर्यवेक्षक सुदामाळी, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, विंचूर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा जागर करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे जयंती सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त झाले.


