Breaking
गुन्हेगारी

एटीएम कार्डची अदलाबदल करून सेवानिवृत बँक अधिकाऱ्याची चाळीस हजारांची फसवणूक; पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 3 9 6 1

न्यायभूमी 

नाशिक जिल्हा दि.०४ जुलै कैलास उपाध्ये 

पिंपळगाव बसवंत येथील एस.बी.आय च्या ए.टी.एम.मध्ये हातचलाखीने ए.टी.एम कार्डची अदलाबदल करून एका ७५ वर्षीय वृद्धाच्या खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय म्हातारबा निफाडे,वय ७५, रा.एस.बी.आय बँक कॉलनी, शिरसगाव रोड,पिंपळगाव बसवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत,दि.२९ जून रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथील एस.बी.आय ए.टी.एम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या निफाडे यांचे ए.टी.एम कार्ड आरोपींनी हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून फसवणूक केली.

या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(२),३१८(४)३१९(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकिता महाले करीत आहेत.  

पिंपळगाव बसवंत येथील एस.बी.आय च्या ए.टी.एम.मध्ये हातचलाखीने ए.टी.एम कार्डची अदलाबदल करून एका ७५ वर्षीय वृद्धाच्या खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय म्हातारबा निफाडे, वय ७५, रा.एस.बी.आय बँक कॉलनी, शिरसगाव रोड, पिंपळगाव बसवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत,दि.२९ जून रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथील एस.बी.आय ए.टी.एम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या निफाडे यांचे ए.टी.एम कार्ड आरोपींनी हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून फसवणूक केली.

या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(२),३१८(४)३१९(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकिता महाले करीत आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 9 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे