Breaking
महाराष्ट्र

खेडलेझुंगे येथे रखडलेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास 

पोलीस बंदोबस्तामध्ये उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी शिवार रस्ता केला खुला

0 8 9 9 8 2

न्यायभूमी न्यूज 

निफाड दि २५ जानेवारी प्रतिनिधी बाबा गिते 

ज्या शेतकर्‍यांना रस्ते,दळणवळणाची साधने सहज व सुकर उपलब्ध आहेत, त्या प्रदेशाची आर्थिक सुबकता व परिस्थिती सुधारते. म्हणजे रस्ते आर्थिक उन्नतीचे द्वार आहेत.

मात्र बहूतांश गावांमध्ये पाणंद, शिवार रस्ते अतिक्रमीत झाले आहेत. काही ठिकाणी पुर्ववैमनस्यातून पाणंद रस्ते बंद करण्यात आले आहेत. आजही ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वाद सुरु आहेत. शासन दरबारी अर्ज विनंत्या केल्या जातात. बर्‍याचदा वाद विकोपाला जाऊन भांडणतंटे आणि कोर्ट कचेरी सुरु आहे.

निफाड तालुक्यामध्ये अशा प्रकरणात तात्काळ कार्यवाही होऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी निफाड उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे हे अँक्शनमोडवर आलेले आहेत. आता अतिक्रमित पाणंद, शिवार रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. यामुळे अतिक्रमीत रस्त्यांवरील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. 

आज निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे ते सारोळे थडी हा जुना सुमारे शंभर ते दिडशे वर्षापासून पुर्वापार चालू असलेला जुना रस्ता गट नंबर २५७(१) गट नं २५७/२ या मिळकतींचे मालकांनी अतिक्रमण करुन २०१६ पासुन बंद केलेले होते.

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल  करणे व दैनंदिन वहीवाटीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली होती. पर्यायी मार्गाचा वापर करत असतांना ४-५ कि.मी. लांबीचा प्रवास करावा लागत होता. परंतु आज (दि.२३) रोजी सदरच्या रस्त्यावरील अवाहतुकतिक्रमण पोलिस बंदोबस्तामध्ये उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार विशाल नाईकवाड व स.पो.नि.भास्करराव शिंदे यांच्या उपस्थीतीमध्ये मोकळा करण्यात आलेला आहे. 

गट नंबर २५७ (२) पासून खेडलेझुंगे-धारणगांव विर शिवरस्ता पर्यंत व तेथुन पुढे सारोळे थडी ते धारणगांव राज्य महामार्गापर्यंत असा अंदाजे ४००-४५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमण दुर करण्यात आलेले आहे. यामुळे या रस्त्यावर अवलंबुन असलेले १००-१५० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे, स.पो.नि.भास्कर शिंदे यांचेसह मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर पगार, ग्राम महसुल अधिकारी हरिष ऐटवार व विठ्ठल पोटरे, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब कदम, विजय सदाफळ, तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र साबळे, अमोल साबळे, धर्मराज घोटेकर, विजय हागोटे, मच्छिंद्र साबळे, संतोष साबळे, कैलास हागोटे, यादव साबळे, बापू हागोटे, भास्कर साबळे, म्हाळू साबळे, राजेंद्र साबळे, विलास गिते, भास्कर शिंदे, नंदकिशोर साबळे, रामेश्वर शिंदे, रमेश गिते, मंगेश निंबाळकर, संदिप गिते, सुभाष गिते, सचिन घोटेकर, सचिन गिते, नारायण सदाफळ, पोलीस पाटील जयराम सोनवणे, पो.शि.संदिप शिंदे, कोतवाल योगेश पवार आदींसह रस्त्यावरील शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

आज रोजी निफाड तालुक्यातील २२ शिवार रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. यामुळे सदरचे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. प्रशासनाने केलेल्या कामकाजामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल व दैनंदिन व्यवहारासाठी ये-जा करण्यासाठी जवळचे मार्ग खुले झालेले आहे. विशा नाईकवाडे, तहसिलदार निफाड 

गावागावांत दळणवळणासाठी रस्त्यांचे मोठे महत्व आहे. आजरोजी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शिवार रस्त्यांवर अतिक्रमण झालेले असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती कामासाठी लांबच्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

तसेच अशा गैर प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये हानामाऱ्या, कोर्ट कचेऱ्यांमध्ये वेळ व पैसा वाया जात आहे. आजरोजी तालुक्यातील अनेक रस्ते खुले करण्यात आलेले आहे. तेथील शेतकऱ्यांनी व गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी निफाड 

खेडलेझुंगे येथील अतिक्रमीत रस्त्याची पहाणी करुन भोटवटधारकांसमवेत बैठक घेवुन त्यांची समजुत काढुन रस्ताच्या मार्ग मोकळा केला त्यावेळी उपस्थीत अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी शेतकरी वर्ग.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे