Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नांदगावची सुकन्या कु.पल्लवी निकम ठरली – नवदुर्गा पुरस्काराची मानकरी

न्यायभूमी न्यूज संस्थापक पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

विचूर दि.०३ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर

     कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा. सोमनाथ निकम यांची कन्या कुमारी पल्लवी ठरली नवदुर्गा पुरस्काराची मानकरी क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक – शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त देण्यात येणाऱ्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.

 नवदुर्गा पुरस्कार .कुमारी पल्लवी सोमनाथ निकम हिची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.

    कुमारी पल्लवी सोमनाथ निकम ही अगदी लहानपणापासूनच अभ्यासात जशी हुशार आहे .तशीच खेळातही एक आपलं अस्तित्व दाखविणारी विद्यार्थिनी आहे.

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा,आठवी स्कॉलरशिप,इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा,एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा याही परीक्षांमध्ये तिने उत्तम असे यश संपादन केले आहे.

तसेच अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्येही तिने बक्षीस मिळवलेले आहेत,तसेच बेसबॉल या खेळामध्ये कुमारी पल्लवीची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झालेली होती.

तसेच सन 2025 या शैक्षणिक वर्षात कर्मवीर भाऊराव पाटील व विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर या विद्यालयांमध्ये इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिने 92.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला होता. 

सध्या पल्लवी ही विंचूर महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्स वर्गात शिक्षण घेत असून याच महाविद्यालयातून तिने वुडबॉल या खेळामध्ये सहभाग घेऊन 19 वर्षाखालील मुलींचा संघ विजयी झालेला असून विभागीय स्तरावर या संघाची निवड झालेली आहे.

या मुलींच्या संघाचे कर्णधार अर्थात नेतृत्व देखील पल्लवी करीत आहे.

    तिच्या कला क्रीडा व अभ्यास या सर्व गुणवत्तेचा विचार करून क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा सन 2025 चा नवदुर्गा पुरस्कारासाठी कुमारी पल्लवी सोमनाथ निकम हिची निवड झालेली आहे.

अनेक मान्यवरांच्या हस्ते कुमारी पल्लवीचे शाल,श्रीफळ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.डॉक्टर सुजितजी गुंजाळ साहेब,तसेच रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य मा.सुनीलजी मालपाणी साहेब,शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.जगदिश जेऊघाले काका,तसेच उपाध्यक्ष मा.कैलास सोनवणे साहेब,मा.अनिल दरेकर व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष मा.राजेंद्र गोरे साहेब,गुरुकुल उपाध्यक्ष – दत्ता दरेकर,मा संदिप जोशी,मा.नानाभाऊ गाडे तसेच मा किशोर भाऊ दरेकर – व्हा.चेअरमन खरेदी – विक्री संघ लासलगाव व सर्व समिती सदस्य;तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मा.नंदकुमार देवढे उपप्राचार्य वाबळे सर ; लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा मा.चांदे सर,पर्यवेक्षक मा.माळी सर,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख मा.राजेंद्र टिळेकर,तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी तसेच वनसगाव विद्यालयाचे माजी प्राचार्य सी डी रोटे सर यांनी कुमारी पल्लवीचे खूप कौतुक व अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे