Breaking
महाराष्ट्र

संतोष श्रमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज बाभुळगाव येथे संतोष टॅलेंट सर्च परीक्षा

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

येवला दि.२० जानेवारी पुष्पा पाटील

दिनांक.18 जानेवारी रविवार रोजी एस.एस.एम. विद्यालय व ज्युनियर कॉलेज बाभुळगाव येथे RCC classes (मोटेगावकर सर) नाशिक व SSMV कॉलेज बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

टॅलेंट सर्च परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, बुद्धिमत्ता व विशेष क्षमता ओळखण्यासाठी घेण्यात आली,त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिभावंत विद्यार्थ्यांची ओळख करून विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक,बौद्धिक व तर्कशक्तीची क्षमता शोधण्याचा प्रयत्न केला.

यातूनच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे,गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे,प्रमाणपत्रे,शिष्यवृत्ती किंवा विशेष सवलती देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविता येतो.

आजच्या बदलत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना योग्य असे करिअर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार योग्य शिक्षण व करिअरची दिशा मिळावी यासाठी योग्य असे मार्गदर्शन करता येते.

सदर परीक्षेस तालुक्यातील 43 शाळांमधून जवळपास 1133 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.

दीड तासाचा पेपर झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन लेक्चर आयोजित करण्यात आले होते.

त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनीअर व विविध क्षेत्रात करिअर करण्यासंदर्भात NEET, JEE, MHTCET या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

सदर परीक्षेस मार्गदर्शन करण्यासाठी RCC क्लासेस नाशिक शाखेचे श्री.प्राध्यापक मनोज दिंडे सर व संधान गुरुकुल चे श्री.वैभव संधान सर व त्यांच्या टीम चे मार्गदर्शन लाभले.

संतोष टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाणदेश च्या प्रांजल घनघाव विद्यार्थिनीने पटकावला,तिला रोख स्वरूपात 5001 रुपये,ट्रॉफी, सर्टिफिकेट व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच द्वितीय क्रमांक एन्झोकेम विद्यालाचा विद्यार्थी स्वरीत शिंदे यांने पटकाविला,त्याला 3001 रु,ट्रॉफी,सर्टिफिकेट व बुके देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर तृतीय क्रमांक बनकर पाटील विद्यालय अंगणगाव चा प्रणव आहेर याला मिळाला,त्याला रोख 2001 रु तसेच ट्रॉफी सर्टिफिकेट व बुके देऊन गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.लक्ष्मण भाऊ दराडे उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्राचार्य गोरख येवले यांनी केले,तर सूत्र संचालन श्री.प्रदीप पाटील यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री.किरण पैठणकर यांनी केले.

सदर परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक,प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे