निफाड तालुक्यातील कामाख्या माता मंदिर येथे पहिलाच नवरात्र उत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

न्यायभूमी
लासलगाव दिनांक १७ ऑक्टोंबर
कैलास उपाध्ये
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे नव्याने साकारलेल्या सिद्ध माँ कामाख्या माता मंदिरात भाविकांचा अथांग जनसागर उसळला आहे. आसाममधील मूळ कामाख्या देवीच्या मंदिराच्या धर्तीवर उभारलेले हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे भव्य कामाख्या मंदिर आहे. सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आणि विशेष महापूजा सोहळ्यांमुळे या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे.
अध्यक्ष गणेश जगताप यांनी मंदिरातील विशिष्ट पद्धतीने केलेल्या होमहवन बद्दल माहिती दिली व धरणगाव कामाख्या मंदिराची वैशिष्ट्ये सांगितले. आज नवरात्रीच्या सातव्या माळी प्रसंगी न्यायभूमी न्युज प्रतिनिधी कैलास उपाध्ये यांनी अध्यक्ष गणेश जगताप यांची प्रतिक्रिया घेऊन मंदिरातील अलोट गर्दीचा जनसागर उसळल्याचे चित्र समक्ष पाहण्यात आले.
भव्य वास्तुकला या विस्तीर्ण मंदिर संकुलामध्ये १११ खांब आणि २१ ते ५१ आकर्षक कळस असून त्याची भव्यता सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
मूर्तींची स्थापना मुख्य गाभाऱ्यात सिद्ध माँ कामाख्या देवीसह नवनाथ, भगवान शिव आणि श्री गणेशाच्या अतिशय देखण्या मूर्ती विराजमान आहेत.
शिल्पकार हे भव्य मंदिर उभारण्यासाठी पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील सुमारे २५० कारागीरांनी अहोरात्र काम केले आहे.
स्थानिक महत्त्व या मंदिरामुळे महाराष्ट्रातील व परिसरातील भाविकांना आसामला न जाताच अगदी नाशिकजवळ कामाख्या मातेच्या दर्शनाचा आध्यात्मिक लाभ घेता येत आहे.



