Breaking
महाराष्ट्र

एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल बाभूळगाव येथे बाल आनंद मेळावा व आठवडी बाजार उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

येवला दि.११ जानेवारी पुष्पा पाटील

 

Oplus_131072

जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक या स्कूलमध्ये आज दिनांक 10 जानेवारी 2026 शनिवार रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद मेळावा व आठवडी बाजार हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, उद्योजकता,आत्मविश्वास व सहकार्याची भावना निर्माण करणे हा होता. 

पैशांची देवाणघेवाण अंकगणित तसेच आपल्या राष्ट्रीय मूल्यांपैकी जीवनमूल्य व श्रम प्रतिष्ठा या मूल्यांची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व दैनंदिन जीवनातील व्यवहार यांची माहिती होण्यासाठी उपयुक्त ठरले या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळाला

या आनंददायी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थ त्यामध्ये प्रामुख्याने पावभाजी ,पुरीभाजी,शेवपुरी,इडली सांबर, पाणीपुरी,कांदाभजी,वडापाव,भेलपुरी,शीरखुर्मा,ज्यूस कोल्ड कॉफी इत्यादी बाबींचा यात समावेश होता.

तसेच आठवडी बाजारातील सर्व भाजीपाला, फळे यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या व फळे यांचा समावेश होता तसेच शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावले होते.

प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी विक्री-खरेदीचे व्यवहार स्वतः सांभाळत प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालक,शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविला यामध्ये प्रामुख्याने लहान विद्यार्थ्यांनी भाजीपाला व फळे हे विक्रीसाठी आणले होते.

तसेच आनंद मेळावा या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनमूल्य नफा तोटा व्यावहारिक ज्ञान या संकल्पनेतून आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमा मागील मुख्य हेतू साध्य झाला.

या उपक्रमामध्ये 155 विद्यार्थी सहभागी होऊन त्यामध्ये सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत उलाढाल झाली त्यातून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला तसेच त्यांना गणित या विषयातील अंकगणित ,नफा तोटा या संदर्भातील बहुमोल असे ज्ञान मिळाले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय श्री.रुपेश भाऊ दराडे साहेब उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा शालेय जीवनातील व्यवहारिक ज्ञान मिळणाऱ्या उपक्रमांमुळे जीवनोपयोगी कौशल्ये विकसित होतात असे सांगितले.

या उपक्रमाप्रसंगी एस.एस.एम.विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गोरख येवले सर, एम. ए.बी.डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री.विवेक काशीद सर तसेच आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री.निलेश शिंदे सर,उपप्राचार्य श्री.संदीप पाटील सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून ते विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झालेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व ज्ञानवर्धक ठरला.यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात व्यवहार ज्ञान उद्योजकता त्यांच्यातील लाजाळू व भित्रपणा कमी होऊन आत्मविश्वास व सहकार्याची भावना निर्माण होईल.

या सर्व गोष्टींचा त्यांना त्यांच्या जीवनात फायदा होईल असे मत शाळेचे प्राचार्य निलेश शिंदे यांनी व्यक्त केले,तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे