Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभुळगाव येथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन

न्यायभूमी

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

येवला दि.१४ मार्च पुष्पा पाटील 

जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव येवला येथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता,राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मानवंदना अर्पण केली.

 

महिला दिनाच्या निमित्ताने शाळेत “स्त्री शक्तीचे समाजातील योगदान” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मार्गदर्शकांनी सांगितले की आजच्या आधुनिक युगात महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

महिलांना योग्य संधी, सन्मान व सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या समाजाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून येवला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीमती शिवानी पैलवान तसेच एम एड कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती रश्मी जोशी हे उपस्थित होते.

तसेच प्रमुख मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर भाष्य करत आजच्या स्त्रीशक्तीचे समाजातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले

 

या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित प्रभावी भाषणे, कविता,मनोगते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्त्री शिक्षण, स्त्री सन्मान आणि समानतेचा संदेश देणारी नाटिका देखील सादर केली.

तसेच विद्यार्थ्यांसाठी महिला दिनानिमित्त घोषवाक्य लेखन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महिलांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती देत स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यातील महिलांचा आदर करावा आणि त्यांना समानतेने वागणूक द्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

 

सदर कार्यक्रमांमध्ये आलेल्या महिलांसाठी शाळेच्या वतीने खेळ पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या खेळांमध्ये चार राऊंड करण्यात आले त्यात विजेता व उपविजेता महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली त्यामध्ये विजेता म्हणून श्रीमती उज्वला जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवत पैठणी जिंकण्याच्या मानकरी ठरल्या तसेच श्रीमती वैशाली जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेत्या बनण्याचा मान मिळविला

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी शाळेचे प्राचार्य श्री शिंदे सर यांनी आभार प्रदर्शन करत अशा सामाजिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सन्मान, समानता आणि स्त्री सक्षमीकरणाविषयी जागरूकता निर्माण होते असे मत व्यक्त केले.

 

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण प्रेरणादायी झाले असून विद्यार्थ्यांनी समाजात स्त्री सन्मानाचा संदेश देण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य करत कार्यक्रमाला यशस्वीरित्या पूर्णविराम दिला व उपस्थित सर्व महिलांचे आभार व्यक्त केले तसेच विजेत्या महिलांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे