ज्येष्ठ नागरिक संघ लासलगाव येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्युज सपादकिय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १५ ऑगस्ट निशिकांत पानसरे

ज्येष्ठ नागरिक संघ लासलगाव येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त धावपटू सौ संजीवनी पगार यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी जलतरणपटू कुमारी श्रावणी देसाई व स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा गुंजाळ तसेच अनाथ आश्रमाचे परमपूज्य बहुरूपी बाबा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी वेफको चे चेअरमन श्री संजय बापू होळकर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघ लासलगाव व अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ लासलगावचे श्री अशोक नाना होळकर होते.

कार्यक्रमाचे ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथी धावपटू सौ संजीवनी पगारे, जलतरणपटू कुमारी श्रावणी देसाई, स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा गुंजाळ व वे फ को चे चेअरमन श्री संजय बापू होळकर यांची एन एच आर डी एफ नवी दिल्ली येथे संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाचा कार्यक्रम नंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर,सचिव डॉक्टर श्री कैलास पाटील अहिल्याबाई महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सौ पुष्पाताई दरेकर,एस आर शिंदे,अरविंद देसाई,मनोहर वाघ,शिवाजी होळकर,सीएस पाटील भरत शेठ वडनेरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



