विचूर येथील काही युवकांचा गुंडगिरी भाषा चा व्हिडिओ सोशिया मीडियावर व्हायरल
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विचूर दि.१२ ऑक्टोंबर अभय पाटील
काही दिवसांपूर्वी तीन ते चार युवकांनी गुंडगिरी च्या भाषेत रील बनवून सोशल मीडियावर अपलोड केला होता यामुळे सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिडोरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या सध्या विंचूर येथील नामदेव मंदिर परिसरात राहणारे तीन चार तरुणांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी 11 वाजता सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला.
यात त्यांनी एखाद्या चित्रपटातील खलनायकप्रमाणे डायलॉगबाजी केली आहे.यामुळे हा व्हिडीओ खूप चर्चेत आलेला असतांना लासलगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी कसून तपास करीत या तरुणांच्या मुसक्या आवळल्या.
तसेच समाजातील या व्हायरस विरुद्ध अँटीव्हायरस व्हिडीओ अपलोड करून कानून के हाथ कितने लंबे होते हे दाखवून दिले.
तसेच परिसरातील नागरिक भरभरून लासलगाव पोलीस स्टेशनचे कौतुक करत आहे.