तहसीलदार कार्यालय निफाड व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिलदार कार्यलयात जागतिक ग्राहक दिन साजरा
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
निफाड दि.१९ मार्च
तहसीलदार कार्यालय निफाड आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक १७ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुरवठा निरीक्षक श्री अतुल गायकवाड भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा अधिकारी श्री उल्हास टरले यांनी केले या जागतिक ग्राहक दिनानिमित्त श्री किरण जोशी संघटक निफाड तालुका ग्राहक पंचायत यांनी ग्राहकांनी कसे सजग व्हावे व झालेल्या फसवणुकीपासून स्वतःला कसा न्याय मिळवून द्यावा याबाबत माहिती दिली.
संतोष सोनवणे निफाड तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी ग्राहकानी कोणतीही वस्तू खरेदी करताना घेण्यात येणाऱ्या बिलाचे महत्व सांगितले तसेच निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या इतिहासावर त्यांच्या शैलीत प्रबोधित केले.
वसंत दंडवते यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास दुय्यम निबंधक जगताप मॅडम,तालुका कृषी अधिकारी,तालुका कृषी,ढवळे साहेब निफाड पोलीस स्टेशन,तसेच ,अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना,रेशन दुकानदार
ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे सहसघटक नारायण पिंपळे,सिमाताई डेर्ले,संतोष सोनवणे,विजय पाटील,आशाताई पाडाळकर तसेच ग्राहक उपस्थित होते.



