प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे महिलांसाठी स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान संपन्न
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी
विचूर दि ०३ ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर
बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे महिलांसाठी स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याला एक नवा आयाम देण्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र निमगाव वाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आरोग्य शिबिरात स्त्रीरोग,बालरोग,नेत्रचिकित्सक, आहार समुपदेशक,योगमार्गदर्शन अश्या सर्व सेवा एकाच छताखाली देऊन एकूण 239 लाभार्थीना मोफत आरोग्य सेवा देण्यात आल्या.
आरोग्य तपासण्या बरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शन आणि रक्त तपासणी,रक्तदाब, मधुमेह,क्षयरोग, अॅनिमिया, तपासणी,महिलांसाठी खास सेवा, किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन,पोषण आहार मार्गदर्शन,आभा कार्ड आयुष्मान कार्ड, गोल्डन कार्ड या माध्यमातून लासलगाव,विंचूर, पाचोरा,पिंपळगाव नजीक, निमगाव वाकडा येथील गरोदर महिलांची,वृद्ध महिला पुरुष, बालके,किशोरवयीन मुली,मुले यांच्या मोफत आरोग्य तपासण्या करून आरोग्या शिक्षण देण्यात आले.
त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री अविनाश पाटील आणि डॉ श्री वरुणराज ठाकरे,बालरोग तज्ज्ञ डॉ श्री सागर घनघाव,नेत्र रोग तज्ञ श्रीमती ऐश्वर्या महाजन,समुपदेशक श्री विकास आडे, राष्ट्रीय बाल संगोपन पोषण आहार समुपदेशक श्री विकास आडे,योगशिक्षक श्री भूषण वडनेरे, आरोग्य निरीक्षक,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,रक्त संकलक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा गट प्रवर्तक,आशा सेविका,आणि अंगणवाडी कार्यकर्त्या,परिचर,वाहनचालक,डाटा ऑपरेटर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान केले.
फक्त आरोग्य तपासणी नाही,तर महिलांच्या आत्मसन्मानाचा, विश्वासाचा आणि आरोग्यदायी भविष्यासाठीच्या आशेचा दीपस्तंभ आहे.अशी प्रतिक्रिया डॉ श्री अविनाश पाटील यांनी दिली.


