न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २२ जुलै:-
विंचुर येथील इंदिरानगर परिसरातील पवार ट्रेडींग कंपनी येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लासलगाव पाेलिसांनी छापा टाकला.
यामध्ये तीन पानी जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींकडून राेख रक्कम,माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सागर सुर्यभान आरोटे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विंचूर इंदिरानगर परिसरातील पवार ट्रेडींग कंपनी येथे जुगार खेळत व खेळवित असल्याची गुप्त माहिती लासलगाव पाेलिसांना मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी तेथे अतुल लक्ष्मण धुमाळ, वय २३ वर्ष, दिपक सदू कुऱ्हाडे, वय ३२ वर्ष,लखन बाळु मोरे, वय २७ वर्ष तिघे रा.इंदिरानगर विंचुर,नितीन परशराम कांबळे,वय 32 वर्ष,रा.उशीर गल्ली विंचूर,मजर सलिम शेख,वय ३६ वर्ष,रा.शनि मंदिर विंचुर,दिपक दत्तु बोडके वय ४२ वर्ष,रा.निफाड रोड,विंचूर,चेतन वसंत कुलकर्णी, वय ३५ वर्ष,रा.विंचूर हे तीनपानी नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहे.