Breaking
संपादकीय

पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांचा लासलगाव येथे शताब्दी सोहळा उत्सहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दि २६ डिसेंबर दत्तात्रय दरेकर

भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या शताब्दी जयंती सोहळा दिनानिमित्त लासलगाव येथे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण कार्यक्रम साजरा झाला.

जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्य मनिष चोपडा,लासलगांव शहराध्यक्ष शेखर होळकर,कोषाध्यक्ष निलेश लचके यांच्या आयोजनात आणि सौ सुवर्णा जगताप (भाजपा महामंत्री नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तर महाराष्ट्र) ,जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे.

सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.

सुवर्णा जगताप यांनी आपले मत व्यक्त करताना लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री.अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.

भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

एक उत्कृष्ट संसदपटू. ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

या कार्यक्रमाप्रसंगी वकील प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष वाल्मीकराव गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष शेखरभाऊ होळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धर्मेश जाधव, गुजराती समाज प्रकोष्ठ अध्यक्ष राजूशेठ राणा, भाजपा ज्येष्ठ नेते दत्तुलालजी शर्मा, गायत्री परिवारचे विजय रावल, दिव्यांग आघाडीचे प्रमुख भूपेंद्र दगडे, राजाभाऊ सुरसे, भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश सहसचिव मनीष चोपडा, लासलगाव मंडल सरचिटणीस निलेश जगताप , व्यापारी आघाडीचे निलेश लचके , संतोष पलोड, सचिन लचके, लक्ष्मन खलसे, सुनील डचके, जगदीश कलंत्री, संतोष राजोळे, बाळासाहेब शिंदे, सुरेशचंद नाहटा, ज्ञानेश्वर शिंदे, सुधीर झांबरे, राजू नागरे, कैलास बोराडे, आयाज शेख, पूजा भावसार, भारती महाले तसेच इतर कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे