Breaking
गुन्हेगारी

पहाटे व्यावसायिकावर गोळीबार सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर दि २६ मार्च:

शहरातील नवाबपुरा परिसरात एका व्यावसायिकावर गोळीबार झाला. बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हसीब मोहमद सलीम काझी (33, रा. नवाबपुरा) हे खारी टोस आणण्यासाठी जात असताना अनोळखी इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला.

हसीब काझी हे जमिन खरेदी-विक्री व्यवसाय करत असून ते सकाळी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस सुजुकी (MH20GU2234) गाडीवरून जात असताना त्यांच्या घरापासून अवघ्या 50 फूट अंतरावर अचानक फटाक्यासारखा आवाज आला.

त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता, समोर 6 फूट उंचीचा, सडपातळ बांध्याचा अनोळखी इसम उभा होता. त्याने शिवीगाळ करत हसीब यांच्या दिशेने गोळी झाडली.

सुदैवाने गोळी त्यांच्या टोपीच्या अगदी जवळून गेली, त्यामुळे ते घाबरून घरी परतले.

यानंतर त्यांनी मित्र शहबाज खान याला घटनेची माहिती दिली आणि उजेड पडल्यावर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

गाडीची पाहणी केली असता,तिच्या डाव्या बाजूला “ACCESS 125” या अक्षरांच्या मधोमध गोळी लागल्याचे आढळले.

हसीब काझी यांचे भाडेकरू नासेर सय्यद रौफ याच्यासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्याने यापूर्वी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि हसीब यांना अडकवण्याची धमकी दिली होती,असे फिर्यादीने सांगितले.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर आणि तपासी अधिकारी साळवे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे