हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
वसमत दि ०१ जुलै विशेष प्रतिनिधी
श्रीनिवास विद्यामंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री श्रीधर लोखंडे हे होते.प्रमुख पाहुणे संथेचे गौरव कमळू, मिलिंद आळणे,गुरुनाथ गाडेकर समतादूत (बार्टी) हे होते.
सूत्रसंचालन वैभव चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि पुरोगामी राजकारण करणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती साजरी करण्यात आली.
राजकारणासह शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत. लोकभिमुख समाजकारण करणाऱ्या वसंतराव नाईक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सर्वाधिक काळ विराजमान होते.
वसंतराव नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सदन शेतकरी कुटुंबात 1 जुलै 1913 रोजी झाला.
वसंतराव नाईक हरितक्रांती पंचायतराज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.
आभार प्रदर्शन संदीप पातेकर सर यांनी केले.यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



