Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे जनता विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे विसर्जन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि. १८. सप्टेंबर प्रतिनिधी –

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक शाडू माती पासून बनविलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले . पोलीसपाटील रामदास वारुंगसे व सौ.वारुंगसे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली.

पाचव्या दिवशी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीचे विद्यालयामध्येच एका पाण्याच्या पिंपात मुख्याध्यापक रामदास वाजे यांच्या हस्ते श्रीचे विसर्जन करण्यात आले. श्रींचे ड्रममध्ये विसर्जन करून ड्रममधील पाणी शालेय आवारातील वृक्षांना घालण्यात आले.

यामुळे पर्यावरण संरक्षणास हातभार लागणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही.तसेच जलप्रदूषण होणार नाही.
यावेळी विद्यालयात आयोजित महाप्रसादाचा लाभ इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.
शाडू मातीपासून गणपती बनविण्याची या कार्यशाळा विद्यालयात आयोजित करण्यात आली होती.

७० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून आकर्षक व सुंदर श्री. गणेश तयार केले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी देखील याच मुर्तीची स्थापना केली आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या उपक्रमात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे , सांस्कृतिक समिती प्रमुख पी. आर. करपे, सोमनाथ गिरी ,रामदास वारुंगसे,कचेश्वर शिंदे,डोंगरसिग रबडे,सोमनाथ पगार,सुनिल ससाणे,रेखा खंडीझोड, भारती निखाडे,सुषमा थोरात,राजेंद्र गांगुर्डे,रवि गोजरे,किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने, ऋषिकेश कुंदे,निवृत्ती बर्गे,संकेत जाधव,शालेय पंतप्रधान शिवम शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे