न्यायभूमी न्यूज
खडक माळेगाव दि ०४ सप्टेंबर — राजेंद्र जाधव
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी गेल्या दोन वर्षापासून गरजवंत मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या लढ्याला ऐतिहासिक यश मिळाल्याने खडक माळेगाव चे सर्व मराठा बांधव ग्रामदैवत श्री हरि बाबा मंदिरात आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमा झाले. ग्राम दैवत हरीबाबां आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.
मराठा तरुणांनी गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरून विजयी घोषणा देत आनंद साजरा केला मनोज दादांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारे खडक माळेगाव मराठा तरुणांनी प्रथम साखळी उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ खडक माळेगावकरांचे व सर्व समाज बांधवांनी दिलेला पाठिंबा म्हणून सर्वांचे अभिनंदन केले.
आनंद व्यक्त केला गावातून मुंबई येथे चालू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले मराठा आंदोलक श्री कैलास दादा रायते श्री जयवंत राजोळे श्री ज्ञानेश्वर रायते श्री विकास अप्पा रायते श्री गोकुळ शिंदे श्री राकेश रायते श्री आबा रायते श्री काका राजोळे यांचेही सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

आंदोलन काळात मुंबई येथे भाजी भाकरी पाठविण्यासाठी विकास रायते यांच्या एका हाके वर गावातील युवकांनी गाडी भर शिधासामुग्री जमा करून मुंबई येथे रवाना केली प्रसंगी सरपंच जगदीश पवार उपसरपंच शांताराम रायते साहेबराव कान्हे आप्पा तात्या शिंदे सुरेश रायते रमेश रायते यांचे मनोज दादा जरांगे यांच्या कार्यावर व मराठा आरक्षणावर भाषणे होऊन मोठ्या आनंदात कार्यक्रमाची सांगता झाली तसेच यापुढेही मराठा संघर्ष योध्दा माननीय मनोज दादा जरांगे यांनी हाक दिल्याबरोबर हजर राहू असेही विकास रायते यावेळी म्हणाले मिळालेल्या मराठा आरक्षणाबद्दल सर्वच गावकरी आनंदित होते.



