Breaking
क्रिडा व मनोरंजन

सकाळ न्युजपेपर तर्फे एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल बाभूळगाव येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

न्यायवमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

दि.१९जानेवारी पुष्पा पाटील

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ न्युज पेपर तर्फे जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभुळगाव येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे, तसेच सामाजिक,पर्यावरणीय व राष्ट्रीय विषयांप्रती त्यांची जाणीव जागृत करणे हा होता.सदर उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी केली होती.

त्यामध्ये पहिला अ गट इयत्ता 1ली व 2री या गटात माझा स्वेटर व कानटोपी,आमची कार,माझा पाळीव प्राणी,रांगोळी डिझाईन या विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रांची रेखाटन केले दुसरा ब गट इयत्ता 3री व 4थी या गटात स्पर्धेचे विषय होते.

आमचा पाळीव प्राणी,माझी खोली,माझी मैत्री ,घरातली परसबाग.तिसरा क गट इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी या गटामध्ये निवडणूक प्रचार फेरी रस्सीखेच गणपती विसर्जन मिरवणूक व बस स्टॅन्ड असे विषय होते.

यानंतर शेवटचा व चौथा गट-ड या गटात इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तु पाहायला गेलेली शालेय विद्यार्थ्यांची सहल,घोड्यांची शर्यत,मनोरंजनात ए आय चा कसा वापर करता येईल व कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंग,रेषा व कल्पकतेच्या माध्यमातून प्रभावी चित्रे साकारली.

 

सदर चित्रकला स्पर्धेमध्ये विविध गटात शाळेतील 541 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला

यामध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शालेय मैदानावर नाशिक येथे संपन्न होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याची थीम एस.एन.डी.महा कुंभ असे नाव तयार करण्यात आले त्यामध्ये चार रंगाच्या टी-शर्ट चा वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर अशी कलाकृती तयार केली.

स्पर्धेदरम्यान शाळेतील शिक्षकांनी उत्तम नियोजन व शिस्त राखत कार्यक्रम यशस्वी केला. चित्रकला स्पर्धेमुळे संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे व कलात्मक वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना सकाळ न्युज पेपरतर्फे आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

सदर चित्रकला स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य श्री निलेश शिंदे,उपप्राचार्य संदीप पाटील ,कलाशिक्षक श्री नितीन पोकळे,श्री रुद्राक्ष वाघ तसेच बंड सर,बच्छाव सर,पांडा सर,आकाश सर,तेलोरे मॅडम,काळे मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच अधीक्षक सूर्यवंशी सर,सोनवणे सर,रोटे मॅडम,पावरा मॅडम,गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य केले.

शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे आजची चित्रकला स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे,अशी अपेक्षा शाळा प्रशासन व पालकांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार श्री.किशोर दराडे, संचालक मा.श्री.रुपेश दराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे