खडक माळेगाव येथील मौनगिरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चेअरमन व्हा चेअरमन बिनविरोध
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
खडक माळेगाव दि ०९ ऑगस्ट मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर
खडक माळेगाव दि ०९
न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र/राजेंद्र जाधव
मौनगिरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खडक माळेगाव चेअरमन व्हा चेअरमन निवडणूक पार पडली.
संस्थेचे माजी चेअरमन त्रंबक सिताराम रायते व्हा चेअरमन सुनीता दत्तू रायते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदी चेअरमन साहेबराव जगन्नाथ रायते तसेच व्हा चेअरमन निवृत्ती शंकर घोलप यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक राजाराम बापू रायते,पोपटराव जगन्नाथ रायते,नानासाहेब बापू राजोळे,बेबी अशोक रायते,उत्तम विश्वनाथ रायते ,सुदर्शन दशरथ सुडके,शरद अंबादास शिंदे ,हरिश्चंद्र अशोक जाधव,उषा राजेंद्र जाधव, भास्कर मुरलीधर कान्हे,जगन्नाथ दामू रायते,रतन बापू साप्ते,सचिव केशव भास्कर रायते ,अल्पबचत प्रतिनिधी राजेंद्र दत्तू जाधव यांच्यासह विकास आप्पा रायते,किरण शिंदे, सोमनाथ रायते,वाल्मीक रायते,अशोक नाना रायते,सुरेश रायते,पंढरीनाथ रायते,रवींद्र शिंदे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन व्हा चेअरमन यांची निवड होऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल,श्रीपाळ देऊन सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस सुरेश रायते व विकास रायते यांनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन राजाराम बापू रायते यांनी केले.



