चेंबूर मुंबई येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयात मोफत विधि समुपदेशन शिबिर
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
चेंबूर दि.२९ मार्च

चेंबूर,मुंबई येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयात दिनांक 28,मार्च 2026 रोजी विनामूल्य विधी सेवा केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत विधी समुपदेशन शिबिर (Free Legal Counseling Camp) चे आयोजन करण्यात आले होते.
सदरील शिबिरास समाजातील विविध घटकातील लाभार्थीना कौटुंबिक,स्थावर मालमत्ता,क्रीमीनल,सिव्हिल केसेस तसेच कामगार विषयक आणि रेरा संबधित कायद्याचे समुपदेशन करण्यात आले.
सदरील शिबिरास वकिल म्हणून ॲड.अनूप पाल,ॲड.ओमप्रकाश लालवाणी, ॲड. प्रदीप सावंत,ॲड.शुभम चव्हाण,ॲड.जिप्सन जॉन, ॲड.दिव्या तिवारी, ॲड केवल,ॲड.राहुल घरात, ॲड.सुजाता शेलार,ॲड.सुयश बारटके यांनी समुपदेशन केले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी विवेकानंद विधी महाविद्यालयाच्या प्रा.दिपाली बाबर,डॉ.अर्चना खांडवे,डॉ.स्वप्निल चौधरी,डॉ.रजवंत राव,प्रा. मिहीर भट्ट,प्रेरणा भंडारी आणि तेजस मायेकर तसेच विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि विष्णू पंत,विष्णू पाटणकर,सौरभ जोशी,सुमित शेट्टी,सुमन,जुई चव्हाण,जान्हवी वाधवानी,श्रेया पांडे यांनी नियोजन केले.



