Breaking
आरोग्य व शिक्षण

ताहाराबाद विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

ताहाराबाद -दि २७ जून विशेष प्रतिनिधी

ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज,ताहाराबाद विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिपक डावरे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य दिपक डावरे व पर्यवेक्षक बी. एस.जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डावरे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे सांगितले.

त्यानंतर विद्यार्थी भाषणांमधून दिव्या नंदन,जानवी शिरसाठ,हर्षल गवळी आदि विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक भाषणांमधून राहुल पगार यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी तसेच आभार उपशिक्षक सुजित देवरे यांनी मानले.

तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक एस.के. निकम,जे.एल.गावित,के.जी.अहिरे,के.एम.मोरे, के.ए.बागुल,एस.बी.सोनवणे,श्रीमती पी.पी. माटे,जे.पी.बच्छाव, के.बी.चव्हाण,आर. जी.संसारे,श्रीमती एस.बी.रौंदळ,एस.आर. दळवी,श्रीमती डी.आर.गावित,एस.जी.गिरी, एस.ए.पवार, एस.यू.भामरे,एस.पी.देवरे,आर.डी. पगार,श्रीमती एस.व्ही.सूर्यवंशी,डी.एल. कापडणीस,जयदीप मोरे,डी.व्ही.सोनवणे, एल.यु.साळवे, वाय.व्ही.पवार तसेच सुनील देवरे, सखाराम अहिरे,निलेश माळी,कुणाल देवरे, धनंजय वणीस,मंगेश पगारे,प्रवीण रौदळ मामा उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे