ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रहार प्रणित लासलगाव दिव्यांग समिती यांचे वतीने लासलगाव एस टी आगाराला निफाड तहसील थांब्याचे निवेदन निवेदन
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.१० फेब्रुवारी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रहार प्रणित लासलगाव दिव्यांग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगाव येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक सौ सविता काळे यांना निफाड येथे तहसील कार्यालयाकरिता येण्याचा व जाण्याचा अधिकृत कायमस्वरूपी बस थांबा देणे बाबत निवेदन देण्यात आले.
यामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक यांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे तरी हा थांबा मंजूर व्हावा याकरिता दोन्ही संघटनांनी आग्रह धरला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष वसंत दंडवते निफाड तालुका संघटक किरण जोशी तसेच महामंडळाचे सहायक वाहतूक निरीक्षक रोहित सानप सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन बोठे व दिव्यांग समिती लासलगावचे प्रतिनिधी राजू सुरशे भूपेंद्र जैन संजय विसपुते चंद्रकांत भावसार अविनाश देसाई मनोज परेराव प्रवीण गाडे किरण देसाई ताराबाई घोडे राम गव्हाणे तसेच समाधान जगताप (पत्रकार) हे हजर होते.



