Breaking
महाराष्ट्र

सहकार सप्ताहानिमित्त निफाड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 0 1 7 1

न्यायभूमी 

 लासलगाव दि.०३ जुलै 

सहकार सप्ताहानिमित्त आज सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,निफाड कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, निफाड येथील अधिकारी व कर्मचारी, विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी व व्यवस्थापक,एनडीसीसी बँकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून झाली.या प्रसंगी सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने कैलास सोनवणे (सहकार अधिकारी),निळकंठ सावंत (सहाय्यक सहकार अधिकारी),दत्तात्रय नाईकरे (सहकार अधिकारी, श्रेणी-१),कृष्णा वाळके (मुख्य लिपिक),विकास वाघ (कनिष्ठ लिपिक) तसेच भदाणे (शिपाई) यांनी वृक्षारोपणात उत्साहाने भाग घेतला.

कार्यालयातील मुख्य कार्यक्रमानंतर, त्र्यंबकराव घुगे गुरुजी भाग्यश्री सहकारी पतसंस्था, निफाड यांच्या शाळेच्या आवारातही वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

या प्रसंगी सहकार अधिकारी कैलास सोनवणे, सहाय्यक सहकार अधिकारी निळकंठ सावंत, पतसंस्थेचे चेअरमन घुगे, संस्थेचे पदाधिकारी, व्यवस्थापक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या वृक्षारोपण उपक्रमातून समाजात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

केवळ वृक्षारोपण न करता,उपस्थित सर्व अधिकारी,कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी नेहमी योगदान देण्याचा सामूहिक संकल्प केला.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे