Breaking
महाराष्ट्र

श्री गोपाळ कृष्ण मंदिर लासलगाव तालुका निफाड अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव यांच्याद्वारे शनिवार दिनांक ९/८/२५ ते शनिवार दिनांक १६/८/२५ दरम्यान आयोजित

0 8 9 9 8 5

न्यायभूमी न्यूज 

 लासलगाव दिनांक १६ ऑगस्ट निशिकांत पानसरे 

  श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव यांच्याद्वारे शनिवार दिनांक ९/८/२५ ते शनिवार दिनांक १६/८/२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.अखंड हरिनाम सप्ताहाचे 91 वे वर्ष होते.

सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये भजन कीर्तन व गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने परिसरातील व गावातील भाविक बंधू-भगिनी उपस्थित होते.या अखंड चाललेल्या हरिनाम सप्ताह मध्ये नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन खूपच श्रवणीय होते.

या कीर्तन सोहळ्यासाठी भजनी मंडळीचे व टाळकरी मंडळींचे उत्कृष्ट साथ लाभल्याने कार्यक्रम अधिकच मनोरंजक व उत्साहवर्धक झाला.

या आठ दिवस चाललेल्या अखंड सोहळ्यांमध्ये परिसरातील भजनी मंडळींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 

      या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह भ प श्री परमेश्वर महाराज जायभावे यांच्या कीर्तनाने झाला.या आठ दिवस सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या उत्कृष्ट गायकांचे व टाळकरी मंडळींचे उत्कृष्ट सात लाभल्याने त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.

तसेच वेफकोचे चेअरमन संजय बापू होळकर यांची एन एच आर डी एफ नवी दिल्ली संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव यांच्या वतीने सत्कार त्यांचा सत्कार करण्यात आला.

या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शेवटच्या दिवशी महाप्रसादाने करण्यात आली. 

अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगावचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर,डॉक्टर कैलास पाटील,कवी प्रकाश होळकर,डॉक्टर युवराज पाटील,विष्णू निकम,सुरेश वडनेरे,संजय पाटील, भरत पाटील,शंतनू पाटील,माजी आमदार श्री कल्याणराव पाटील,डॉक्टर सतीश धुळेकर तसेच लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य एस आर शिंदे,सी एस पाटील,अरविंद देसाई, शिवाजी होळकर,एकनाथ थोरात,हिरामण घोडे, अशोक अग्निहोत्री,जितू गुरव,सिताराम काका जगताप,हेमंत जगताप,रवी जाधव लासलगावातील परिसरातील भाविक भक्तांनी परिश्रम घेऊन अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीपणे संपन्न झाला.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे