कोळगाव येथील आरोग्य सेवीकेने गाडी मध्येच केली प्रसुती
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
कोळगाव दि.१२ नोव्हेंबर अजिंक्य जगताप
कोळगाव ता निफाड येथील जाधव कुटुंबातील एका गर्भवती महिलेला पहाटे प्रसुती कळा चालू झाल्या प्रसंग बिकट होता त्यांनी लगेच गावातील आरोग्य सेवीका सौ साधना संजय घोटेकर यांच्याशी संपर्क साधला परिस्थिती चे गांभीर्य पाहुन त्यांनी ह्या कुटुंबाला धिर देत गाडीने निफाड येथील दवाखान्यात जान्याचा निर्णय घेतला परंतु गर्भवती महिलेला नैताळ्या च्या पुढे जास्त कळा सुरू झाल्या व आता गाडी मध्येच प्रसुती करावी लागणार हे लक्षात आल्यावर साधना ताई ह्या पुढे सरसावल्या व आपला आठरा वर्षाचा अनुभव आता आपल्या कामी येईल.हे त्यांनी जाणले परंतु गर्भ हा जुळ्या मुलांचा असल्याने व कुठलेही सुविधा नसल्याने काय निर्णय घ्यावा हे त्यांना कळेना परंतु आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन व महीले बरोबर असणाऱ्या तिच्या आई ची मदत घेत एका छानश्या गोंडस बालकास सुखरूप जन्म देत डिलेवरी ही केली व गाडीत असलेल्या दुसऱ्या महिलेची निफाड येथील दवाखान्यात प्रसुती केली कोणत्याही सुविधा नसताना आधांर व उजेडाची सोय ही नाही.
अशात मोबाईल च्या उजेडात त्यांनी ह्या महीलेचे प्राण वाचले त्यांच्या ह्या धाडसाचे मुलींच्या सर्व कुटुंबाने त्यांचे आभार मानले अशा धाडसी महीलेचे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.



