Breaking
आरोग्य व शिक्षण

नॉटी किड्स प्री प्रायमरी स्कूल येथे वार्षिक सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

लासलगाव दि.०३ मार्च /सहसंपादक सुनील पोळ 

येथील रायते एज्युकेशन अँड सोशल सोसायटी नाशिक या संस्थेच्या नॉटी किड्स प्रि-प्रायमरी स्कूल लासलगाव येथे शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा पार पडला.

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन,शिवजयंतीचा सोहळा,कथा नाट्यीकरण,कविता नृत्यासह सादरीकरण ,आणि पारंपारिक तसेच आधुनिक गीतांवर नृत्य अशा सर्व प्रकारचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व विद्यार्थ्यांनी वरील सर्व प्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन यश संपादन केले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री शिवाअप्पा सुराशे (मा.सभापती प.स निफाड) यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून श्री सचिनजी होळकर (सरचिटणीस नाशिक जिल्हा काँगेस कमिटी) , सौ.योगिता पाटील ( सरपंच,ग्रामापालिका लासलगाव) श्री शंतनू पाटील ( चेअरमन लासलगाव विभाग खरेदी विक्री संघ) श्री सुरेश रायते (मा.चेअरमन खरेदी विक्री संघ लासलगाव),ॲड.श्री विजयराम रायते (नोटरी तसेच संचालक एल.डी.पी. बैक लासलगाव) , श्री सुनिलजी पोळ (पत्रकार,युवा उदयोजक लासलगाव).मान्यवर उपस्थित होते. 

 मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ विद्यार्थ्यांना पारितोषिके,मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये १)फॅन्सी ड्रेस पारितोषिक विजेते 

 प्रथम- कु. शिवांश ज्ञानेश्वर जाधव

द्वितीय- कु. श्लोक अमोल फाफाळे

तृतीय- कु. ईशान संग्राम कदम

 २) 100% अटेंडन्स ऑफ द इयर अवार्ड –

 कु. शिवाज्ञा बापुसाहेब रायते

३) बेस्ट ओरल परफॉरमन्स ऑफ द इयर अवॉर्ड 

 कु. क्रिशा योगेश आघाव

४) बेस्ट आय-क्यू ऑफ द इयर- 

कु. अनिका अमोल दरेकर

५) बेस्ट सपोर्टीव पॅरेन्ट्स ऑफ इयर अवार्ड-

श्री. व सौ. अमोल बनसोडे

तसेच पोयम कौम्पिटीशन,आय क्यू टेस्ट,गुड नाईट पार्टी,रेड डे,यलो डे,पिंक डे,ब्लॅक अँड व्हाईट डे रिपब्लिक डे,इंडिपेंडन्स डे,तसेच विविध सण जसे पोळा,आषाढी एकादशी,गणपती उत्सव,दसरा,दिवाळी,मकर संक्रांती,नाताळ इ सेलिब्रेशन मध्ये उत्कृष्ठ विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..

याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री सचिनदादा होळकर व शिवाअप्पा सुराशे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तसेच रायते एज्यू सोसायटी या संस्थेचे सचिव श्री बापुसाहेब रायते यांनी मान्यवरांचा सत्कार करून सर्वांचे आभार मानले.

या सोहळ्यासाठी शिक्षिका सौ.पल्लवी रायते, सौ.वैशाली जाधव,सौ.तृप्ती कवडे सौ.मनीषा कहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे