Breaking
आरोग्य व शिक्षण

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नूतन विद्यालय खडक माळेगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

न्यायभूमी न्यूज

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज

खडक माळेगाव दि ११ ऑगस्ट ज्ञानेश्वर भवर

खडक माळेगाव 11 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनानिमित्त नूतन विद्यालय,खडक माळेगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सामाजिक बांधिलकी जपत सोनिया ताई होळकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सोनिया ताई होळकर यांच्या हस्ते आणि त्यांच्या वतीने विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी एक वही देण्यात आली.

 या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ,खडक माळेगाव संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुखदेव वामन रायते यांनी सोनिया ताई होळकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.

यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सोहम रायते यांना बळीराजा कृषी सन्मान पुरस्कार 2025 हा जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री.निवृत्ती काळुजी रायते व श्री. संजय भास्कर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोनिया ताई होळकर आणि सुशील भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला श्री.देवराम एकनाथ शिंदे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुशील सुधाकर भोसले, श्री. भाऊसाहेब नेहरे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा रायते,आदिवासी मित्र मंडळ,खडक माळेगाव,ग्रामस्थ,विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका सौ.मंजुषा रायते यांनी सोनिया ताई होळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.संस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी सोनियाताई यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एस.एम.दाभाडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे