Breaking
ब्रेकिंग

पत्रकारांवर होणार्‍या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 17 पासुन राज्यभर आंदोलन – : संतोष निकम

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

पिंपळगाव बसवंत दि १३ फेब्रुवारी निखिल अहिरे 

राज्यात निर्भीड पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांवर सातत्याने होणारे भ्याड हल्ले ही चिंताजनक बाब असून या निषेधार्थ राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला.

संतोष निकम हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय अध्यक्ष जन्मदिन मास निमित्त आयोजित पत्रकार कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. निर्भीडपणे पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक ठिकाणी अवैध धंदे, गौण खनिज माफिया, वाळू माफिया व त्यांना सहाय्य करणारे भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी व गावगुंड यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. पत्रकारांना धमकावणे, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देणे असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे.

अशावेळी काही ठिकाणी पोलीस देखील पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यास हेतुपुरस्सर विलंब करतात व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यास अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे देतात.

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ हा राज्यातील पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून राज्यात प्रत्येक तालुका व जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन, पत्रकार वसाहती उभाराव्या, पत्रकार प्रवास करत असलेल्या पत्रकारांच्या वाहनांना टोल माफी मिळावी यासह विविध समस्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे. 

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने मुद्रीत (प्रिंट) आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाह, विकास पत्रकारिता, पत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावी, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . 

राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा वाढदिवस पत्रकार मास म्हणून महिनाभर संपूर्ण राज्यात साजरा केला जातो त्यानिमित्ताने ही पत्रकार कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन जेष्ठ कवी विठ्ठल संधान यांच्या हस्ते करण्यात आले आले .

या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, ह्यूमन राईट्स प्रदेशाध्यक्ष गुड्डू सय्यद,पत्रकार संघ प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर, संतोष अहिरे, विजय केदारे, जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, पोलीस मित्र संघ प्रदेश अध्यक्ष मनोहर देसले, प्रगतशील द्राक्ष उत्पादक जयराम डोखळे, साहित्यिक राजेंद्र गांगुर्डे, पत्रकार बापू चव्हाण, तुषार झेंडफळे, हेमंत थेटे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष आढाव, अश्विनी कोटमे आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता करणार्‍या पत्रकार व समाजसेवक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 

  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ कार्यशाळेमध्ये अनेक जिल्ह्यांतुन हजारोच्या संख्येने पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस स्थानिक पत्रकारांना होणारा त्रास सर्व पत्रकारांनी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने या गोष्टी वरती लवकरच हे काढावा बैठक घेऊन येणारे अडचणी दूर करण्यात येतील असे सर्व पत्रकारांना आश्वासन दिले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे