लासलगाव पोलीस ठाण्याच्या सहा.पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील रुजू; सहा.पो.निरीक्षक भास्करराव शिंदे यांना भावूक निरोप
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विचूर दि.१३ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून सन्मा.दीपक पाटील यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला.
त्यांच्या नियुक्तीमुळे लासलगाव व विंचूर परिसरात समाधान व्यक्त होत असून,त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल,असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले भास्करराव शिंदे (API) यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांना विंचूर व लासलगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने निरोप देण्यात आला.हा निरोप समारंभ अत्यंत भावूक वातावरणात पार पडला.
शिंदे साहेबांच्या कार्याचा अमिट ठसा भास्करराव शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले नाही,तर आपल्या मनमिळाऊ स्वभावाने जनमाणसात अढळ स्थान निर्माण केले.
सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि कामापलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध जपण्याच्या त्यांच्या शैलीमुळे आज त्यांना निरोप देताना उपस्थित प्रशासन,राजकीय नेते,पत्रकार आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी तरळले.
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना याप्रसंगी विंचूर येथील कैलास सोनवणे,किशोर पाटील,विलास गोरे,किशोर जेऊघाले,सोहेल मोमीन तसेच डोंगरगाव आणि खडक माळेगाव तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिंदे साहेबांचे कार्य लासलगाव परिसरात कायम स्मरणात राहील,अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत
नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे स्वागत करताना ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली की,त्यांच्या काळात सर्वसामान्यांना तत्पर न्याय मिळेल आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल.
दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.