न्यायभूमी लासलगाव दि११ सप्टेंबर निशिकांत पानसरे

ज्येष्ठ नागरिक संघ लासलगावचे अध्यक्ष व नाशिक जिल्हा फेस कॉम चे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर यांची अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
श्री अशोक नाना होळकर ज्येष्ठ नागरिक संघाचे सूत्र हाती घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शहरातील व गावातील ज्येष्ठ नागरिक संघांना अर्जित अवस्थेत आणण्याचे मोलाचे कार्य केले.
त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाने गावातील व शहरातील मोठ्या संख्येने बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद झाले.तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
“हाती घ्याल ते तडीस न्या”याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, वनभोजन व ज्येष्ठांसाठी सहली असे विविध उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले.त्यामुळे नागरिकांचे आपुलकीचे नाते तयार होऊन ज्येष्ठ नागरिक संघाबद्दल नागरिकांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला.

या त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात येऊन त्यांना अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
श्री नानांचा ज्येष्ठ नागरिक संघ लासलगावचे सचिव डॉक्टर श्री कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मनोहर वाघ,एस आर शिंदे,अरविंद देसाई,सी एस पाटील,शिवाजी होळकर,एकनाथ थोरात, हिरामण घोडे,वैकुंठ होळकर,डॉक्टर युवराज पाटील,अशोक राऊत,अरुण राऊत,पगार सर ,बिरार अण्णा व ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




