Breaking
कृषीवार्ता

विंचूर येथे उपबाजार आवारास ८ हेक्टरवर जागा मंजूर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि ०९ ऑगस्ट सुनिल क्षीरसागर 

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवाराकरिता सुभाषनगर ग्रामपंचायत हद्दीतील ८ हेक्टर ६१.५६ आर जागा राज्य शासनाकडून शासकीय दराने मंजूर झाली आहे.

अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप,उपसभापती संदीप दरेकर यांनी दिली.

लासलगाव बाजार समितीने विंचूरसह परिसरातील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी स्वमालकीची २ हेक्टर ४० आर जागा खरेदी करून विंचूर येथे उपबाजार आवार सुरू केले आहे.

सदर उपबाजार आवारात कांद्यासह भुसार व तेलबियांचे लिलाव सुरू आहेत.

शेतकरी बांधवांसाठी भुईकाटा,गोदाम,कॅन्टीन, पिण्याच्या पाण्याचा आर.ओ.प्लांट,पाण्याची टाकी,कार्यालयीन इमारत आदी सुविधा निर्माण केल्या आहेत.

विंचूर उपबाजार आवारात शेतमालाला मिळणारा योग्य बाजारभाव, व्यापारीवर्ग व बाजार समितीकडून मिळणाऱ्या उत्तम सुविधांमुळे विंचूर उपबाजार आवारावर अल्पावधीतच शेतीमालाची आवक वाढून उपलब्ध जागा अपुरी पडू लागली.

अपुऱ्या जागेचा अभाव लक्षात घेता २०२१ मध्ये तत्कालीन सभापती सुवर्णा जगताप व संचालक मंडळाने छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गालगत विंचूर औद्योगिक वसाहतीजवळील सुभाषनगर ग्रामपंचायत हद्दीतील ८ हेक्टर ६१.५६ आर जागा शासकीय दराने खरेदी करून देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविला होता.

सुवर्णा जगताप, बाळासाहेब क्षीरसागर व विद्यमान सभापती ज्ञानेश्वर जगताप आदींसह सर्व संचालक मंडळाने वेळोवेळी संबंधित मंत्री महोदयांकडे केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने ६ ऑगस्ट २०२५ रोजी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवाराकरिता सुभाषनगर ग्रामपंचायत हद्दीतील जागा उपबाजार या सार्वजनिक प्रयोजनासाठी नाममात्र एक रुपये दराने कब्जेहक्काची रक्कम आकारून व वसूल करून मंजूर केल्याचे कळविले आहे.

बाजार समितीस शासकीय दराने जागा संपादित करून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, पणनमंत्री जयकुमार रावल,आ.दिलीप बनकर, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक जयदत्त होळकर,पंढरीनाथ थोरे,राजेंद्र डोखळे, सुभाषनगरचे सरपंच,उपसरपंच,सचिव सचिव नरेंद्र वाढवणे आदींचे सहकार्य लाभल्याचे जगताप यांनी सांगितले.

प्रतिक्रिया- 

शासकीय दराने मंजूर जागेत शेतकरी बांधवांसाठी प्रशस्त बाजार आवार,वॉल कंपाउंड, काँक्रिटीकरण,भुईकाटा,पिण्याचे पाणी,शेतकरी निवास,कार्यालयीन इमारत आदी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करून कांदा, भुसार, तेलबिया,बेदाणा,फळे व भाजीपाला आदी शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचे प्रयोजन आहे.

ज्ञानेश्वर जगताप,सभापती,बाजार समिती, लासलगाव

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे