Breaking
महाराष्ट्र

बांग्लादेशी घुसखोरांचा तपास करून कारवाई करा मा.पोलीस आयुक्तांना निवेदन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

माढा दि १८ फेब्रुवारी माढा तालुका प्रतिनीधी हनुमंत मस्तुद

       महाराष्ट्रातील प्रमुख शहरात बांग्लादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात देखील बांग्लादेशी घुसखोर बेकायदेशीर शहरात असल्याची शक्यता असून, त्यांचा तपास लावून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी.

अशा मागणीचे निवेदन ‘मी सोलापूर माझे सोलापूर’ परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मा.पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

        मा पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात, आपल्या हिंदुस्तानच्या लगत असलेल्या शेजारी बांग्लादेशातुन मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे.

प्रत्यक्षात कलकत्ता, मुंबई, बेंगलोर, अशा सर्व राज्यातील प्रमुख शहरात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे आपल्या शहरात राहत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील घुसखोरी करून राहत असल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत.

इतकेच नव्हे तर अनेक बांग्लादेशी घुसखोर आधार कार्ड, रेशन कार्ड बनावट बनवून शासनाचे लाभ घेत आहेत., अशा परिस्थितीत सोलापूर शहर हे कर्नाटक, आंध्र , तेलंगणा राज्याच्या लगत आहे., याचा फायदा घेऊन अनेक बांग्लादेशी नागरिक घुसखोरी करण्याचे नाकारता येत नाही. येणारा काळ हा विविध सार्वजनिक उत्सवाचा काळ आहे. या कालावधीत बांग्लादेशी घुसखोरी करून शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी माननीयांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या शहरातील सर्व भागात बांग्लादेशी नागरिकांची शोध मोहीम हातात घेऊन, त्यांना जेरबंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निवेदन विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा. पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

निवेदन देण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी,विठ्ठल कुराडकर , मौला शेख, गुरुनाथ कोळी , बालाजी भंडारी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, प्रसाद जगताप, सादिक शेख यांचा समावेश आहे.

    मा. पोलिस आयुक्तांना सोलापूर शहरात बांग्लादेशी घुसखोरांची तपास करून कारवाई करणे बाबत निवेदन देताना विष्णू कारमपुरी (महाराज) व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे पदाधिकारी दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे