वक्फ बोर्डाची नोंद करणा-या हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल रोकडे यांची हकालपट्टी करा अन्यथा सकल हिंदू समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
सकल हिंदू समाज, अखिल भारतीय संत समिती धर्मसभा आणि पुरोहित महासंघाचा इशारा
न्यायभूमी न्यूज
नासिक दि १४ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले निवेदन देण्यात आले.हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल एकनाथ रोकडे यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करावी.
अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा, अखिल भारतीय संत समिती धर्म सभा व पुरोहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील शासकीय जागा असताना आपल्या पदाचा गैरवापर करून अनिल रोकडे यांनी भुमापन क्रमांक ४८०/३अ/३ब/६ वरील नोंद क्रमांक २०६४५४ दिनांक १५.०१.२०२५ रोजी बोगस नोंद करीत वक्फ बोर्डाचे नाव फेरफार सदरी दाखल केले.
अशा हिंदू विरोधी अधिकाऱ्याला नाशिक मध्ये पदावर राहण्याचा अधिकार नाही राज्यात व देशांमध्ये हिंदूंचं सरकार असताना हिंदू विरोधी कारवाई करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही.
तसेच या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की वरील अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करुन हकालपट्टी करण्यात यावी.
तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेत अवैधरित्या संपत्ती कमावली असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे
तरी अनिल रोकडे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात येऊन त्यांचे वेतन थांबविण्यात यावे.
तसे न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल या वेळी होणाऱ्या सर्व परिणामास जिल्हाधिकारी हे जबाबदार असतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला .

सदर निवेदन देतांना श्री महंत मंडलाचार्य पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्मसभा प्रदेश अध्यक्ष स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज ,धर्म जागरण सभेचे अध्यक्ष



