Breaking
महाराष्ट्र

नियम धाब्यावर,हॉटेल-ढाब्यांत घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 4 4

न्यायभूमी 

नासिक जिल्हा दि.१७ जानेवारी जनार्दन चव्हाण

विंचूर शहर व परिसरात अनेक हॉटेल,ढाबे तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये नियमांना धाब्यावर बसवून घरगुती एलपीजी सिलेंडरचा सर्रास वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

व्यावसायिक आस्थापनांसाठी केवळ १९ किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना,काही हॉटेलधारकांकडून स्वस्त दरातील घरगुती सिलेंडरचा उघड गैरवापर केला जात आहे.

या बेकायदेशीर वापराचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून,घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे,हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच एलपीजी वितरण नियमांचे सरळ उल्लंघन आहे.

अशा प्रकारच्या वापरामुळे आग लागण्याचा,स्फोटाचा व जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असताना संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

नियमभंग करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर तपासणी मोहीम, सिलेंडर जप्ती व दंडात्मक कारवाई अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशी कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

त्यामुळे “कारवाई कोणासाठी थांबली आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक व ग्राहक संघटनांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाने तात्काळ विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी ठाम मागणी केली आहे.

अन्यथा, घरगुती गॅस तुटवड्यासह सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे