Breaking
गुन्हेगारी

चांदवड-लासलगाव मार्गावर ३२ किलो गांजा जप्त;तिघांना अटक

१४.७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

1 1 0 1 6 4

न्यायभूमी 

नाशिक जिल्हा दि.०५ जुलै

प्रतिनिधी कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी 

 नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत चांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात ३२ किलो गांजा जप्त केला.

या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १४ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

         नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.

त्याअंतर्गत ४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदवड परिसरात गस्त घालत असताना, चांदवडकडून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे दिघवद शिवारात सापळा रचून संबंधित कार अडविण्यात आली. पंचांसमक्ष झडती घेतली असता कारच्या डिकीत ३२ किलो गांजा आढळून आला.

या कारवाईत संदीप रामनाथ सानप (वय ३६), अनिल केशव बोडके (वय ३०) आणि यश संदीप मोरे (वय २४), सर्व रा. सिन्नर, जि. नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले.

  याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून ३२ किलो गांजा, स्विफ्ट डिझायर (MH-01-BT-8813), मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १४.७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

          या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून, अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

3/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे