Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे येथील जनता विद्यालयात’संविधान दिन’विविध कार्यक्रम साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि २६ नोव्हेंबर

प्रतिनिधी:- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात’ संविधान दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते.

व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक दिंगबर जाधव,सोमनाथ गिरी,सुनिल ससाणे, कचेश्वर शिंदे,अलका काळोगे आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते संविधानाचे ग्रंथाचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.

संविधानाची निर्मिती ,संविधानातील विविध कलमे ,मुलभूत हक्क, संविधानाचे महत्त्व, संविधान दिन का साजरा करतात याविषयी मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी संविधान प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.आर.करपे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमास विद्यालयातील डी. ए.रबडे,मारुती डगळे,राजेंद्र गांगुर्डे, रामदास वारुंगसे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत, आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे