Breaking
आरोग्य व शिक्षण

पालक-शिक्षक समन्वयाचे व्यासपीठ नूतन विद्यालयात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

कोटमगाव दि ०४ जुलै विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर 

शिक्षण प्रसारक मंडळ खडक माळेगाव संचलित नूतन विद्यालयात पालक-शिक्षक सभा मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.सुखदेव वामनराव रायते यांनी भूषवले.यावेळी सर्व संचालक सदस्य,पालक,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सभेचे विशेष आकर्षण म्हणजे नवीन पालक संघाची स्थापना.या वेळी मुखाध्यापिका सौ. रायते एम.बी.यांची अध्यक्षपदी तर श्री. बाळासाहेब बाबुराव रायते यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

पालक शिक्षक संघाचे सचिव म्हणून श्री.कदम आर. पी यांची निवड करण्यात आली.

सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, शाळेच्या प्रगतीसाठी घेतले जाणारे उपक्रम आणि पालकांच्या सहभागाबाबत खुली आणि सकारात्मक चर्चा झाली.

शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद निर्माण होऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

पालक-शिक्षक समन्वय अधिक दृढ होण्यासाठी नूतन विद्यालयाचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे